Home क्राईम Crime: करुणा धनंजय मुंडे यांनी संगमनेरात केला बदनामीचा गुन्हा दाखल

Crime: करुणा धनंजय मुंडे यांनी संगमनेरात केला बदनामीचा गुन्हा दाखल

Sangamner Crime: सोशल मीडियावर आपल्या विषयी आणि चारित्र्या विषयी वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची तक्रार.

Karuna Dhananjay Munde filed a defamation Crime in Sangamner

संगमनेर: माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे – शर्मा यांनी शुक्रवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात  संगमनेर तालुक्यातील कोंची येथे राहणारे भारत संभाजी भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

भोसले यांनी सोशल मीडिया द्वारे आपली बदनामी केली असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संगमनेर शहर पोलिसांकडे केली आहे.

यापूर्वी करुणा मुंडे यांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हाही भोसले यांच्यावर दाखल आहे. भोसले हे वारंवार सोशल मीडियावर आपल्या विषयी आणि चारित्र्या विषयी वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी दिली आहे.

घटनेने संगमनेर मध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी भोसले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.

Web Title: Karuna Dhananjay Munde filed a defamation Crime in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here