संशियीतरीत्या फिरणाऱ्या संगमनेरच्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Ahmednagar News: माळीवाडा परिसरात एक व्यक्ती संशयीतरित्या दुचाकीवर पाण्याची लोखंडी मोटार घेऊन उभा असल्याची माहिती (Arrested).
अहमदनगर: रात्रीच्या वेळी संशियीतरित्या फिरत असणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी माळीवाडा परिसरातून ताब्यात घेतले आहे.
श्रीकांत मधुकर मिसाळ (वय 30 रा. नांदुर खंदरमाळ ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक विनानंबरची दुचाकी व एक पाण्याची लोखंडी मोटार असा 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिसाळ विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत अंमलदार सोमनाथ राऊत यांनी फिर्याद दिली आहे. माळीवाडा परिसरात एक व्यक्ती संशयीतरित्या दुचाकीवर पाण्याची लोखंडी मोटार घेऊन उभा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, रियाज इनामदार, अमोल गाढे, सुजय हिवाळे, संदीप थोरात, सोमनाथ राऊत व एकनाथ निपसे यांच्या पथकाने माळीवाडा परिसरातून तरूणाला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव श्रीकांत मधुकर मिसाळ (वय 30 रा. नांदुर खंदरमाळ ता. संगमनेर) असे सांगितले. त्याच्याकडील दुचाकी व पाण्याची मोटारीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने काही एक माहिती दिली नाही. म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
Web Title: young man from Sangamner who was wandering suspiciously Arrested