Home क्राईम धक्कादायक! दुसऱ्या मित्रासोबत चॅटिंग, वादातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

धक्कादायक! दुसऱ्या मित्रासोबत चॅटिंग, वादातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

Breaking News | Nashik Crime: दुसऱ्या मित्रासोबत मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

Chatting with another friend, boyfriend killed girlfriend due to argument

नाशिक: नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुसऱ्या मित्रासोबत मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

नाशिक खासगी नर्सिंग होममध्ये नर्स असलेल्या युवतीचा प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. काल रासबिहारी आरटीओ लिंक रोडवर म्हस्के नगर येथे या युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

प्रियंका वसावे असे या हत्या झालेल्या २४ वर्षीय युवतीचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी दोन तासांत संशयित प्रियकराचा माग काढत त्याला अटक केली. आरोपीला मदत करणाऱ्या संशयितालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सागर तडवी आणि गुंमनर रासे या दोघांना अटक केली आहे .

आडगाव नाका येथील एका नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून नोकरी करत असलेल्या प्रियंकाचं तिच्या गावातील सागर चिवदास तडवी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा सागर तडवी हा दत्त नगर अंबड येथे राहतो. प्रियंका ही सायंकाळी ५ वाजता त्याला भेटण्यास दत्त नगर येथील त्याच्या खोलीवर गेली होती. दोघांनी सोबत जेवण केले. रात्री सागर झोपलेला असताना प्रियंका एका युवकासोबत चॅटिंग करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. दोघांमध्ये वाद झाले. सागरने चार्जिंग वायरने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह दुचाकीवर आपल्या मित्राला सोबत घेऊन ट्रिपल सीट आणून पंचवटी परिसरात निर्जनस्थळी फेकून देऊन पोलिसांची दिशाभूल करण्यात आली. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.

Web Title: Chatting with another friend, boyfriend killed girlfriend due to argument

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here