Home संगमनेर संगमनेर: महिलेची फसवणूक करुन धक्कादायक प्रकार

संगमनेर: महिलेची फसवणूक करुन धक्कादायक प्रकार

Breaking News | Sangamner:  एकाने महिलेच्या नावाचे गहाणखत तयार करुन बँकेतून २७ लाख रुपयांचे कर्ज घेऊन महिलेची फसवणूक केल्याची घटना.

cheated a woman by taking a loan of Rs. 27 lakh from the bank by creating a mortgage in her name

संगमनेर: भाडेपट्टा कराराच्या दस्तऐवजावर सही घेतल्याचे खोटे सांगून एकाने महिलेच्या नावाचे गहाणखत तयार करुन बँकेतून २७ लाख रुपयांचे कर्ज घेऊन महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुगंधाबाई प्रकाश वाळे (वय ६५, रा. मंगळापूर, ता. संगमनेर) या महिलेने संगमनेर शहर पोलिसांत फियाद दिली आहे. त्यात म्हटले की, मंगळापूर येथे गट क्रमांक ६२/०२ मध्ये माझे ०.३७ गुंठे एवढे क्षेत्र असून त्यापैकी ४ गुंठे क्षेत्र बिनशेती असून ते माझ्या ताब्यात आहे. माझ्या घराशेजारी राहणारा समीर पांडुरंग वाळे हा नेहमी १९ माझ्या घरी येऊन बिनशेती क्षेत्र असलेले भाडेपट्टा करार करुन वापरण्याकरीता मागत होता. त्यानुसार १६ डिसेंबर २०२२ रोजी सदर बिनशेती क्षेत्राचा भाडेपट्टा करार करण्याच्या निमित्ताने मला दुय्यम निबंधक संगमनेर वर्ग २ यांच्या कार्यालयात घेऊन आला. तेथे इंग्रजीमध्ये तयार केलेल्या दस्तऐवजावर माझ्या सह्या घेतल्या, त्यास विचारणा केली असता त्याने मला सदरचा दस्तऐवज हा भाडेपट्ट्याबाबतचा असल्याचे सांगितले. त्यामध्ये भाडेपट्ट्याचा मजकूर लिहिला आहे असे सांगितल्याने मी समीर वाळे याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्या दस्तऐवजावर सह्या व अंगठे दिले. त्यानंतर मी त्याच्याकडे सदर दस्तऐवजाची मागणी केली असता त्याने नंतर देतो असे सांगून मला माझ्या घरी मंगळापूर येथे आणून सोडले. चार महिन्यानंतर माझा मुलगा दीपक याने त्याच्या खासगी कामाकरीता माझे गट क्रमांक ६१/०२ या जमिनीचा ७/१२ उतारा काढला असता त्यावर बँकेचा बोजा चढलेला दिसला. माझ्या मुलाने चौकशी केली असता समीर वाळे याने सदर जमिनीवर गहाणखत करुन बँकेतून २७ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे समजले. यानंतर समीर वाळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने मला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मी व माझा मुलगा आम्ही बँकेत चौकशी करता गेलो असता त्यांनी आम्हांला माहिती दिली नाही. शेवटी समीर बाळे याने फसवणूक केल्याचे आमच्या लक्षात आले. यावरून शहर पोलिसांनी समीर बाळे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहे.

Web Title: cheated a woman by taking a loan of Rs. 27 lakh from the bank by creating a mortgage in her name

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here