Home जालना प्रेमीयुगुलाची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या

प्रेमीयुगुलाची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या

Breaking News | Jalna: प्रेमीयुगुलाने जालना-मंठा रोडवरील – शिंगाडे पोखरी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)  दोघेही विवाहित; एकाच दोरीने गळफास.

Lovers committed suicide by hanging themselves with a single rope

जालना : छत्रपती संभाजीनगरजवळील रांजणगाव शेणपुंजी येथील विवाहित प्रेमीयुगुलाने जालना-मंठा रोडवरील – शिंगाडे पोखरी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कैलास काशीनाथ गवई (वय ३७) व मुक्ता खंडागळे (३५) अशी – त्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटविण्यात यश आले. हे दोघे रांजणगाव येथे एकाच गल्लीतील रहिवासी आहेत. दोघेही विवाहित असून, कैलास गवई यास एक मुलगा आणि मुक्ता खंडागळेला दोन मुले आहेत. त्यांच्या या प्रेमसंबंधाला नातेवाईकांतून विरोध असल्याने ते दोघे गुरुवारी रात्री मोटारसायकलीवरून गायब झाले होते. शुक्रवारी त्यांचे मृतदेह आढळले.

Web Title: Lovers committed suicide by hanging themselves with a single rope

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here