Home संगमनेर संगमनेर: भाऊसाहेब कुटेला या तारखेपर्यंत पोलिस कोठडी

संगमनेर: भाऊसाहेब कुटेला या तारखेपर्यंत पोलिस कोठडी

Breaking News | Sangamner: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांना पोलिसांनी अटक केली.

Bhausaheb Kutela in police custody 

संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांना पोलिसांनी अटक केली होती, शुक्रवारी (दि. २४) त्यांना न्यायालयात हजर केले असता बुधवार २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, असे अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवी मगर यांनी सांगितले.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष कुटे, त्यांचे कुटुंबातील काही सदस्य, संस्था व्यवस्थापक आणि इतर अशा २१ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष कुटे हे पसार होते. कुटे यांना गुरुवारी (दि. २३) अटक करण्यात आली. दूधगंगा पतसंस्थेत २०१७-२०२२ या काळात अंतर्गत लेखापरीक्षण करण्यात आले होते.

Web Title: Bhausaheb Kutela in police custody 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here