ब्रेकिंग: ‘छोटा पुढारी’ घनश्याम दराडेच्या गाडीला अपघात
Pune Accident: ‘छोटा पुढारी’ अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाचा पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. – हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अपघात.
उरुळी कांचन | पुणे: महाराष्ट्रात ‘छोटा पुढारी’ अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाचा काल (बुधवारी) सकाळी नऊ वाजनेच्या सुमारास, पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. – हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाल्याची घटना घडली आहे. दराडे यांच्या अपघातग्रस्त वाहनात त्यांचे आई-वडील व आणखी दोघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दराडे यांच्या आईला किरकोळ जखमी झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम दराडे यांचे आई-वडील, व आणखी दोघेजण बुधवारी (ता. १४) सकाळी पुणे – सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनहुन पुण्याच्या बाजूने निघाले होते. याचवेळी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फाट्यावर अचानक एक वाळूच्या डंपरने दराडे यांच्या चारचाकीला चालकाच्या उजव्या बाजूने ठोसर दिली. या अपघातात चारचाकी गाडीचे नुकसान झाले असून अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती.
Web Title: Chhota Pudhari Ghanshyam Darade’s car accident
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App