Home Uncategorized समलैंगिक युवकाची महिला डॉक्टरच्या वेशात भ्रमंती

समलैंगिक युवकाची महिला डॉक्टरच्या वेशात भ्रमंती

Nagpur: एका युवकाला महिला डॉक्टरच्या वेशात संशयास्पदरित्या फिरताना महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले, चौकशीत तो समलैंगिक (homosexual) असल्याचे समजते.

homosexual young man's Delusions in the guise of a female doctor

नागपूर : मेयो रुग्णालय परिसरात बुधवारी सकाळी १० च्या सुमारास एका युवकाला महिला डॉक्टरच्या वेशात संशयास्पदरित्या फिरताना महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या युवकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक चौकशीत तो समलैंगिक असल्याचे समजते.

बंटी (बदललेले नाव) असे युवकाचे नाव आहे. मेयो रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा युवक बुधवारी सकाळी डॉक्टरांचा ॲप्राॅन आणि बुरखा घालून सर्जिकल काॅम्प्लेक्स परिसरात फिरत होता. वेगवेगळ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन रुग्णाला काय त्रास आहे, कुणाला दाखवायचे आहे, अशी विचारणा करत त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करीत होता.

दरम्यान, एमएसएफ जवानाचे त्याकडे लक्ष गेले. वागणूक संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याला थांबवले. विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. जवानांनी त्याला पकडल्यावर तो पुरुष असल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना सूचना देण्यात आली. प्राथमिक तपासात हा तरुण समलैंगिक (गे) असल्याचे पुढे येत आहे. तो पुरुषांच्या आकर्षणामुळे महिलेच्या वेशात त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करत होता.

Web Title: homosexual young man’s Delusions in the guise of a female doctor

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here