Home अमरावती ‘नीट’ परीक्षेत अपयश आल्याने दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘नीट’ परीक्षेत अपयश आल्याने दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत (NEET) अपेक्षित गुण न मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Two students commit suicide due to failure in NEET exam

अमरावती: वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत (नीट) अनुत्तीर्ण झाल्याने येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी येथील सातुर्णा परिसरात उघडकीस आली. हार्दिक (वय १९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. हार्दिकचे आजोबा भगवानदास हे डॉक्टर आहेत. हार्दिकनेही डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते.

गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरात राहून ‘नीट’ची तयारी करूनही अपेक्षित गुण न मिळाल्याने भावेश तेजसिंह राठोड (१९, रा. पिंपरी फॉरेस्ट, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) या विद्यार्थ्याने खोलीतील सिलिंगला दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपविले. भावेशने गळफास घेण्याअगोदर इंग्रजीत सुसाइड नोट लिहिली होती. त्यात त्याने आई- वडिलांची क्षमा मागून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले.

Web Title: Two students commit suicide due to failure in NEET exam

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here