Home क्राईम मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर ५ वर्षांपासून सुरू होता भयानक प्रकार

मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर ५ वर्षांपासून सुरू होता भयानक प्रकार

Pune Crime: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार (Rape) केल्याची घटना.

a minor girl who came for education was threatened and Rape

पुणे:  पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांपासून हा भयानक प्रकार सुरू होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

शिक्षणासाठी मामाच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकावून एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या ५ वर्षांपासून हा भयानक प्रकार सुरू होता. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रघुनाथ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत युवतीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार,  तक्रारदार युवतीला आई वडील आणि कुटुंबातील कोणी नसून ती पुण्यात शिक्षणासाठी तिच्या मामाकडे आली होती. सप्टेंबर २०१८ ते जून २०२३ या कालावधीत रघुनाथ जो तिच्या मामाचा मित्र होता याने तिला वेळोवेळी अत्याचार केला. मुलगी अनाथ असल्याचा फायदा घेऊन रघुनाथने याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. अखेर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: a minor girl who came for education was threatened and Rape

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here