Home श्रीगोंदा ऊस तोडणी मजुराचा चिमुरडा ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडला अन…

ऊस तोडणी मजुराचा चिमुरडा ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडला अन…

a sugarcane harvester fell on the road from a tractor

श्रीगोंदा: ऊस तोडणी मजूर सुरेश ठाकरे यांचा मुलगा किरण वय ८  झोपेत असताना ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडला. हे उस तोडणी कामगार जळगाव जिल्ह्यातील वनकुटे ता. एरंडोल येथील रहिवासी आहेत. गुरुवारी रात्री नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगाव शिवारातील फरकांडे वस्तीजवळ ही घटना घडली. किरणला परिसरातील लोकांनी आधार देऊन शुक्रवारी आई वडिलांच्या स्वाधीन केले.

उस तोडणी मजूर ट्रॅक्टरमधून माळेगाव ता. बारामती कारखान्यावर जात असताना मढेवडगाव शिवारात किरण ट्रॅक्टरमधून रस्त्यावर पडला. तो रस्त्यावर पडला कोणाला माहीतच झाले नाही. रात्रीच्या अंधारात घाबरलेला किरण आसरा घेण्यासाठी सखाराम गायकवाड यांच्या घराचा दरवाजा वाजविले. रात्रीच्या सुमारास दरवाजा वाजविल्याने गायकवाड कुटुंब चोर समजून घाबरून गेले. त्यांनी मदतीसाठी शेजारी राहणाऱ्या फरकांडे कुटुंबाला फोन करून चोर आल्याची माहिती दिली.

फरकांडे कुटुंबातील सात आठ जण गायकवाड कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले. मात्र वस्तूस्थितीत जखमी अवस्थेत एक लहान मुलगा दाराजवळ दिसला. सर्वांनी त्याला विचारपूस केली. सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी त्या मुलाला उपचारासाठी दवाखान्यात नेले. त्याच्यावरती उपचार केले आणि भीमराव फरकांडे यांनी आपल्या घरी नेऊन आसरा दिला. शुक्रवारी सकाळी ही घटना सोशियाल मेडीयावर व्हायरल करण्यात आली.

ट्रॅक्टरमधून आपला मुलगा बऱ्याच अंतरावर गेल्यावर त्याच्या वडिलांच्या लक्षात आले. ट्रॅक्टर चालक पुन्हा नगरच्या दिशेने आपला ट्रॅक्टर वळविला मात्र शोध लागला नाही. तो ट्रॅक्टर नगरवरून बारामतीच्या दिशेने येत असताना मढेवडगाव येथे एका दुकानावरती थांबला.

उस तोड मजुरांचा ट्रॅक्टर पाहून दुकानदाराने कोणाचा मुलगा हरविला आहे का अशी चौकशी केली असता तो मुलगा त्यांच्याच ट्रॅक्टरमधून पडला हे मढेवडगाव ग्रामस्थांच्या लक्षात आले. किरणला त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Child Chimurda, a sugarcane harvester fell on the road from a tractor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here