मराठा आरक्षण संघटनांमध्ये फुट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न: राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर: मराठा आरक्षण मिळविण्यासाठी भांडणाऱ्या संघटनामध्ये फुट पाडण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. हे मोठे दुर्दैव मानावे लागेल. यासाठी सर्व संघटनानी एकत्र येऊन निर्णय घ्यावा असे आवाहन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. नगर येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची शुक्रवारी भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे याचे प्रमुख कारण म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत धरसोड वृत्ती केली आहे. आरक्षण मिळविण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र यायला हवेत तरच हे सरकार जागेवर येईल. मराठा आरक्षणसंदर्भात हे सरकार अजिबात गंभीर नाही. अशोकन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली आहे. त्या समितीतील किती सदस्यना गांभीर्य आहे. ते बैठकांना हजर नाही. सध्या काय न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे याबाबत त्यांना माहिती नाही. सरकारने विशेष वकील नेमले आहेत. त्यांना फी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. फी ची सुद्धा तरतूद हे सरकार करू शकले नाही. सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही अशी टीकाही राधाकृष्ण विखे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Maratha reservation organizations Radhakrishna Vikhe Patil Said