अकोलेतील कड्यावरून कोसळलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील घोरपडवाडी येथे ११ ऑगस्ट रोजी कड्यावरून कोसळल्याने किसन लक्ष्मण गावंडे वय १२ हा मुलगा जखमी झाला होता. डोक्याला मार लागला असल्याने गंभीर जखमी असलेल्या मुलावर चार दिवसांपासून नाशिक येथे त्याच्यावर उपचार सुरु होते. या मुलाचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
किसन जा आपल्या मित्रांसोबत शिवनदी कडा परिसरातील पायवाटेने शेळ्या चरण्यासाठी चालला होता. यावेळी अचानक साप दिसला आणि मुले घाबरून पुन्हा मागे पळू लागले. त्यावेळी कड्यावरून पाय घसरून किसन गावंडे हा ३५ ते ४० फुट खोल दरीत कोसळला होता. अकोलेत प्राथमिक उपचार करून नाशिक येथे नेण्यात आले होते. उपचार सुरु असताना शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर
Web Title: child who fell from a cliff in Akole died during treatment