Home क्राईम संगमनेरात साडे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार

संगमनेरात साडे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार

Sangamner Four and a half year old girl tortured

संगमनेर | Sangamner: संगमनेरातील एका उपनगरात शुक्रवारी दुपारी घराशेजारी राहणाऱ्या एका परदेशी तरुणाने साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत बालिकेच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रोशन रमेश ददेल असे या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा नेपाळ येथील असल्याचे समजते.  पिडीत बालिकेचे कुटुंब संगमनेर येथे एका उपनगरात राहते. तिचे वडील शनिवारी कामावर गेले असता त्यांच्या पत्नीने मुलीला त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर ते घरी आले. घराशेजारी राहणाऱ्या रोशन चाचा याने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मला घरी बोलावले होते असे पिडीत मुलीने आई वडिलांना सांगितले. तिच्यावर अत्याचार झाल्याचे बोलण्यातून लक्षात आल्यावर तिच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रमेश दादेल यास पळून जात असताना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करीत आहे.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

Web Title: Sangamner Four and a half year old girl tortured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here