Home नाशिक राज्यभरात थंडीने भरली हुडहुडी, नाशिकमध्ये सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

राज्यभरात थंडीने भरली हुडहुडी, नाशिकमध्ये सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

Weather Update:  आणखी काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीने निफाड, नाशिककर गारठले आहेत.

Chilly conditions across the state, lowest temperature recorded in Nashik Weather Update

नाशिक: राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.  अनेक जिल्ह्यांत तापमानात मोठ्याप्रमणावर घट झाल्याचे अनुभव येत आहे.. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत असून, आज देखील ६.८° अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून १०° पेक्षा देखील कमी तापमानाची नोंद धुळ्यात केली जात आहे. आज देखील धुळ्याचे तापमान हे ६.८° सेल्सिअस असल्यामुळे धुळेकरांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे.

घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी पडणाऱ्या नागरिकांना गरम व उबदार कपड्यांचा आधार घेऊनच घराबाहेर पडावं लागत आहे. त्याचबरोबर नागरिकांना थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी शेकोटीचा देखील आधार घ्यावा लागत आहे. यापुढे देखील आणखी काही दिवस थंडीचा जोर अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

नाशिक आणि निफाडकरांना देखील हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नाशिक आणि निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद आज करण्यात आली. निफाडमध्ये किमान ४.४° इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा ८.६° अंशावर घसरला आहे. कडाक्याच्या थंडीने निफाड, नाशिककर गारठले आहेत.

Web Title: Chilly conditions across the state, lowest temperature recorded in Nashik Weather Update

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here