Home अकोले Nilwande Dam: निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

Nilwande Dam: निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

Circulation of drinking water from Nilwande dam

अकोले | Nilwande Dam: निळवंडे धरणातून शनिवारी सकाळी सहा वाजता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या लाभ क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचा वापर या आवर्तनात होण्याची शक्यता आहे. प्रवरा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने तसेच नदी काठच्या गावांना पाणी टंचाई जाणवत असल्याने पावसाने उघडीप दिलेली आहे. अकोले शहरातही दिवसाआड पाणीपुरवठा सुरु होता. लाभक्षेत्रातील पाण्याची टंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

निळवंडे धरणातून १३०० क्यूसेक विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. हे आवर्तन सुमारे पाच दिवस सुरु राहील. या आवर्तनात साधारण 500 दलघफु पाणी वापर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Circulation of drinking water from Nilwande dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here