Home अहमदनगर Murder: समृद्धी रस्ता कामावरील वाहन चालकाचा खून

Murder: समृद्धी रस्ता कामावरील वाहन चालकाचा खून

Samrudhi road work driver's murder

कोपरगाव | Murder: कोपरगाव तालुक्यातील भोजडे लौकी रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या कामावरील वाहनाच्या चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

जगबीरसिंग रामकिसन सिंग वय ५६ रा. नवी दिल्ली असे या मृत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन सुदामराव खटकाळे रा. लौकी ता. कोपरगाव व नितीन सोमनाथ पवार वय २३ रा. मयूरनगर भोजडे ता. कोपरगाव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, कोपगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरु असून या कामानिमित्त असलेला चालक जगबीरसिंग हा गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वाहन घेऊन भोजडे शिवारातील लौकी रोडवरून जात होता. यावेळी सचिन व नितीन यांनी त्यांना अडवले रस्त्याला खड्डे पडले असून इकडून वाहन घेऊन जायचे नाही. महार्मागाची वाहने घेऊन जायचे नाहीत. असे म्हणत शिवीगाळ करून बेदम मारहाण करीत जीवे ठार मारले. चालकाला कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित करण्यात आले.

याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Samrudhi road work driver’s murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here