Home संगमनेर संगमनेर: जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, सहा जणांवर गुन्हा

संगमनेर: जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, सहा जणांवर गुन्हा

Sangamner Crime: जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी, समनापूर येथील घटना.  

Clash between two families due to land dispute, crime against six people

संगमनेर: जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये दोघे जण जखमी झाल्याची घटना समनापूर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत सखाहरी खंडु शरमाळे यांनी शहर पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली. आपण शेत नांगरत असतांना शेत नांगरायचे नाही असे म्हणून तिघा जणांनी दगडाने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असे या फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी दगडाबाई खंडु शेरमाळे, कैलास खंडु शेरमाळे, इरशाद बंडु इनामदार (सर्व रा. समनापुर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 584/2022 भारतीय दंड संहिता कलम 447, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी दुसरी फिर्याद कैलास खंडू शेरमाळे यांनी दिली. आमचे वाट्याची शेत जमिन नांगरु नको आपण मोजणी करुन घेवु. काय असेल ते कायद्याने करू असे म्हणताच आम्हाला वाईट वाईट शिवीगाळ करून आईचे तोंडात मारुन आपणास लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. इरसाद इनामदार हा भांडण सोडविण्याकरीता आला असता त्याचे डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्याचे डोक्यातून रक्त येवु लागल्याने त्याचे जवळ गेलो असता आपल्या डोक्यात लाकडी दांडके मारून जखमी केले.

ही जमीन मीच नांगरणार आहे. तुला काय करायचे ते करून घे. जर तु मला आडवा आलास तर मी तुला, तुझ्या आईला सोडणार नाही, तुमचा काटा काढेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. कैलास शेरमाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोपट उर्फ सखाहारी खंडु शेरमाळे (रा. समनापुर), बाळु रंभाजी खेमनर (रा. साकुर), विकास बाबासाहेब अल्हाट (रा. टाकळी ढोकश्वर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 585/2022 भारतीय दंड संहिता कलम 326, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Clash between two families due to land dispute, crime against six people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here