Home संगमनेर Accident | संगमनेर: म्हाळुंगी पुलावर शिवशाही बस आणि आयशर टेम्पोचा अपघात

Accident | संगमनेर: म्हाळुंगी पुलावर शिवशाही बस आणि आयशर टेम्पोचा अपघात

Sangamner Accident News:  शिवशाही बस चालकाला ब्रेक दाबावा लागल्याने या बसला पाठीमागून येणारा आयशर टेम्पो धडकला. 9 जण जखमी.

Shivshahi bus and Eicher Tempo accident on Mhalungi bridge

संगमनेर: कार चालकाने पुलावर चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करत अचानक कारचा वेग कमी केल्याने शिवशाही बस चालकाला ब्रेक दाबावा लागल्याने या बसला पाठीमागून येणारा आयशर टेम्पो धडकला. या अपघातात टेम्पो चालक, शिवशाही बस चालक आणि प्रवासी असे ९ जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे बाह्यवळण बाह्य महामार्गावर म्हाळुंगी नदीच्या पुलावर हा अपघात झाला.

शुभम वाबळे (आयशर टेम्पो चालक, वय २४) स्वप्नील शेळके (वय ३४, टेम्पो क्लिनर) (दोघेही रा. पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे), अनिकेत सहाणे (शिवशाही बसचालक, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), नीलिमा कचदे (बसमधील प्रवासी वय ५६, रा. वाघोली, पुणे) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वाबळे, शेळके आणि कचवे यांना उपचारार्थ संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाही. शिवशाही बस (एम. एच. १४. जी. यू. ३१०८) आणि आयशर टेम्पो (एम. एच. १२, क्यू. जी. ५२३७) या पुण्याहून नाशिकला जात असलेल्या दोन्ही वाहनांना अपघात झाला. शिवशाही बसचालक सहाणे हे संगमनेरमधील असल्याने त्यांनी लगेचच संपर्क केल्याने जखमींना तात्काळ मदत मिळू शकली. छाती आणि पायाला मार लागला असतानाही त्यांनी जखमींना उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले.

संगमनेर आगार प्रमुख नीलेश करंजकर, संगमनेर तालुक्यातील रहिवासी आणि शिवशाहीचे बसचालक दिगंबर लंके (रा. सारोळे पठार, ता. संगमनेर), विकास पानसरे (रा. घुलेवाडी. ता. संगमनेर), रमेश जगताव (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) हे देखील मदतीसाठी धावून आले. अपघात झाल्याचे पाहून चुकीच्या पद्धतीने पुलावर ओव्हरटेक करणारा कारचालक पळून गेला. अपघाताची (Accident) माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सह्यायाने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: Shivshahi bus and Eicher Tempo accident on Mhalungi bridge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here