Home अहमदनगर अहमदनगर: विहिरीत पडून विवाहित महिलेचा मृत्यू

अहमदनगर: विहिरीत पडून विवाहित महिलेचा मृत्यू

Shrirampur News: विहिरीलगत एका विवाहित महिलेचा विहिरीत पाण्यात पडून मृत्यू (Died).

married woman died after falling into a well

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे कोरेगाव रोड लगत राहत असलेल्या विहिरीलगत एका विवाहित महिलेचा विहिरीत पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

अश्विनी सोमनाथ कुसळकर (वय 25) रा टाकळीभान या महिलेचा मृत्यू झाला आहे. टाकळीभान-कारेगाव रोड लगत या रस्त्यावरील घरापासुन सुमारे अर्धा कि.मी. अंतरावरील विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पवार हे करीत आहे.

Web Title: married woman died after falling into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here