Home अहमदनगर ‘घड्याळ तेच, पण वेळ नवी’ हे राष्ट्रवादीचे नवे घोषवाक्य

‘घड्याळ तेच, पण वेळ नवी’ हे राष्ट्रवादीचे नवे घोषवाक्य

Ahmednagar News NCP:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit pawar) यांच्या पाठीशी ८० टक्के पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. तेच राज्यातील सर्वात जास्त विश्वासार्ह नेते.

the clock is the same, but the time is new' is the new slogan of NCP Ajit Pawar

कर्जत | Karjat:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पाठीशी ८० टक्के पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. तेच राज्यातील सर्वात जास्त विश्वासार्ह नेते असल्याचे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी केले. दादांच्या भूमिकेने नवीन पर्वाला सुरुवात झाली असून आता ‘घड्याळ तेच, पण वेळ नवी’ हे घोषवाक्य घेऊन नव्या निर्धाराने राष्ट्रवादी काँग्रेस पुढील वाटचाल करील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय वैचारिक शिबीर कर्जत येथे सुरू झाले आहे. अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकावण्यात आला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, डॉ. राजेंद्र शिंगणे, आदिती तटकरे आदीसह पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख उपस्थित होते.

शिबिराची सुरुवात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाषणाने झाली. सुरुवातीला त्यांनी आणीबाणीच्या काळापासून केंद्र सरकारमध्ये झालेले राजकीय बदल याची अभ्यासपूर्ण माहिती दिली. २००४ साली मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला असता, परंतु तसं होऊ दिलं नाही आणि ते का नाही होऊ दिलं नाही, याचं स्पष्टीकरण अजितदादा तुम्ही आता द्यायला हवं, अशी सूचना सुनील तटकरे यांनी केली. छगन भुजबळ आणि नंतर माझ्यावर, दादांवर ७० हजार कोटी रुपयांचे सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. अहो पण १९५२ ते २०१२ पर्यंत जो खर्च झाला तो ७० हजार कोटी रुपये होता, मग आमच्यावर ७० हजार कोटी रुपयांचा आरोप केला कसा, असा सवाल उपस्थित केला.

राज्यातील सर्वात विश्वासार्ह नेतृत्व हे अजित पवार आहेत, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. मतदारसंघात काय होईल याचा विचार न करता राज्यातील विधानसभेचे ४३ आमदार आणि विधान परिषदेतील सहा तसेच नागालँड आणि उत्तराखंडमधील आमदार आमच्या सोबत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी पक्ष संघटना बांधली नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अनेकांची प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्याची सूचना अजित पवार यांची होती, असे तटकरे म्हणाले.

Web Title: the clock is the same, but the time is new’ is the new slogan of NCP Ajit Pawar

महत्वाचे: आपला App अपडेट करा प्ले स्टोर ला जाऊन लिंक: पुढीलप्रमाणे अपडेट लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here