Home औरंगाबाद अहमदनगर, नाशिकच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात आले इतके टीएमसी पाणी

अहमदनगर, नाशिकच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात आले इतके टीएमसी पाणी

Ahmednagar News:  जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु.

So much TMC water came to the Jayakwadi Dam project from Ahmednagar, Nashik 

छत्रपती संभाजीनगर: अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणांतून २४ नोव्हेंबर रोजी रात्री शासनाला मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळपर्यंत जायकवाडी धरणात आतापर्यंत ४.२६ टी. एम. सी. पाणी आल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने दिली.

या पाण्यामुळे जायकवाडीचा जिवंत जलसाठा ४४.२६ टक्के झाल्याचे कडा अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी सांगितले. समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार यावर्षी मराठवाड्याला ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील दारणा, भंडारदारा, निलवंडे, ओझर केटीवेअर, मुकणे, कदवा, गंगापूर, मुळा प्रकल्पातून सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी दिला. पाणी सोडण्यावरून अनेक वाद व आंदोलने करण्यात आली होती. नेत्यांमध्ये कलगीतुरा निर्माण झाला होता. मात्र न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पाणी सोडण्यात आले.

Web Title: So much TMC water came to the Jayakwadi Dam project from Ahmednagar, Nashik 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here