Home अहमदनगर सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह या तारखेला अहमदनगरमध्ये

सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह या तारखेला अहमदनगरमध्ये

Co-operation Minister and Home Minister Amit Shah in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: देशाचे पहिले सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शहा शनिवारी (१८ डिसेंबर) अहमदनगर जिल्ह्यात लोणी येथे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे, तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करणार करण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजपाचे जेष्‍ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली आहे.  

मागील महिन्यातच अमित शहा पुण्यात येणार होते. त्यावेळी त्यांचा नगर जिल्ह्यातही दौरा होणार होता. मात्र, तो अचानक रद्द झाला.

आता १८ डिसेंबरला ते नगर जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बॅंक, सहकारी पतसंस्‍था क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Co-operation Minister and Home Minister Amit Shah in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here