Home अहमदनगर ग्रामपंचायत निवडणूक: नगर संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू

ग्रामपंचायत निवडणूक: नगर संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू

code of conduct applies to the entire district Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण ग्रामपंचायतमधील निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

११ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेली आहे. ११ डिसेंबर ते १८ जानेवारीपर्यंत आचारसंहिता लागू असेल. या वेळेत मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती आमदार , खासदार, स्थानिक संस्था प्रतिनिधी यांना करता येणार नाही. जी विकासकामे अर्धवट आहेत अशी कामे आचारसंहिता काळात करता येतील.

जिल्ह्यात एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत. त्यामधील ७६७ ग्रामपंचायती निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या नियमानुसार संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

या आचारसंहितेत नगरपालिका, नागपंचायतचा देखील समावेश आहे. नगरपालिका क्षेत्र व ग्रामपंचायत  क्षेत्र यांचे फारसे अंतर नसल्याने नगरपालिका विकासकामांचा मतदारांवर प्रभाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आचार संहितेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे.

Web Title: code of conduct applies to the entire district Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here