Home नाशिक गरबा खेळताना भोवळ येऊन कोसळला, ऐन नवरात्रात तरुणाचा मृत्यू

गरबा खेळताना भोवळ येऊन कोसळला, ऐन नवरात्रात तरुणाचा मृत्यू

Nashik News: गरबा खेळत असताना भोवळ येऊन पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू (Died) झाल्याची घटना.

collapsed while playing garba, the youth died in Navratri

नाशिक : मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिलेली असताना रविवारी (दि. २२ ऑक्टोबर) रोजी उशिरापर्यंत गरबा खेळत असताना भोवळ येऊन पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र अशोक खरे (वय ३६, रा. त्रिमूर्ती चौक) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

हा तरुण महात्मानगर परिसरातील संत कबीरनगरात गरबा खेळत असताना हा प्रकार घडला होता. नवरात्रोत्सवाच्या अखेरीस शहरात सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र खरे रात्री गरबा खेळण्यासाठी संत कबीरनगर परिसरात आला होता. साडे अकरा वाजताच्या सुमारास भोवळ आल्याने तो कोसळला.

त्याला त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे अडीच वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: collapsed while playing garba, the youth died in Navratri

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here