Rahuri News: तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीतर तुझी बदनामी करेन. अशी धमकी देऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार (sexual abused).
राहुरी: कॉलेज तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच बदनामी करण्याची धमकी देत देत तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील लाख परिसरातून उघडकीस आली आहे.
पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी शिवाजी बाबासाहेब मोरे, रा. सोमय्या फॉर्म, लाख, ता. राहुरी याच्या विरोधात शारिरीक अत्याचार व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील 18 वर्षे 7 महिने वय असलेली पीडित तरूणी शिक्षण घेत आहे. डिसेंबर 2021 ते 2 जुलै 2022 या दरम्यान आरोपी शिवाजी मोरे याने त्या पीडित तरुणीला राहुरी तालुक्यातील लाख येथील फॉर्म येथे बोलावून घेतले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. तसेच तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीतर तुझी बदनामी करेन. अशी धमकी देऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा व महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके आदी फौजफाट्याने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा करीत आहेत.
Web Title: College girl sexual abused by threats