Home जालना जावयाचा सासरवाडीत आढळला मृतदेह, आत्महत्येचा बनाव, हत्या केल्याचा आरोप

जावयाचा सासरवाडीत आढळला मृतदेह, आत्महत्येचा बनाव, हत्या केल्याचा आरोप

Jalna News: आत्महत्या करण्याचा बनाव करीत त्यांची हत्या (Murder) केल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला.

body found in in-laws' house, fake suicide, accused of murder

जालना: सासरवाडीला गेलेल्या जावयाचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर इसमाची पत्नी, सासू सासरे यांनी मिळून आत्महत्या करण्याचा बनाव करीत त्यांची हत्या केल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला आहे.

जालना  शहरातील इन्कमटॅक्स कॉलनी परिसरात एका विवाहित तरुणांचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृत्यूदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमोल सपकाळ (रा. जळगाव, ता भोकरदन) असे मयत आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

अमोल सपकाळ यांच्या भावाने आणि वडिलांनी अमोल याची आत्महत्या नसून त्याचे व त्यांच्या पत्नीचे वाद असल्याने त्यांच्या पत्नीने व सासू सासऱ्यांनी त्यांची हत्या करून आत्महत्याचा बनाव केला असून ते फरार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्याची मागणी करत अमोलच्या पत्नीसह तिचे आई, वडील व भावाला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

Web Title: body found in in-laws’ house, fake suicide, accused of murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here