वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, मुलीची सुटका,आरोपीला अटक
Nagpur Crime: गुजरातमधून मुलीला आणून देह विक्री व्यवसाय (Prostitution business), एकास अटक.
नागपूर: परराज्यातील मुलीना पैशाचे आमिष दाखवून त्यांना नागपुरात आणून हॉटेलमध्ये देह विक्रीचा धंदा करणाऱ्या रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका मुलीची सुटका करण्यात असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
परराज्यातील मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना नागपुरात आणायचा. शहरातील ओयो हॉटेलचा वापर करून ग्राहक शोधत त्याच्याकडून देह व्यापार करून घ्यायचा. त्यातून पैसे कमवायचे हा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये गुजरातमधील एक मुलीला आणून तिच्याकडून देह व्यापार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचला.
हॉटेलवर धाड टाकली असता त्या ठिकाणी एक मुलगी आढळून आली. त्या मुलीची सुटका करण्यात आली असून आरोपी रोशन डोंगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. ओयो हॉटेल हे अशा लोकांसाठी एक ठिकाण बनले असल्याची माहिती समोर येत आहे.
Web Title: Prostitution business exposed, girl freed, accused arrested