Home पुणे Murder: प्रेमामध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून केला खून

Murder: प्रेमामध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून केला खून

Pimpri Murder Case: ऑफीसमध्ये महिलेसोबत प्रेमसंबंध, पत्नीचा अडथळा होत असल्याने गळा आवळून खून.

wife who was an obstacle in love was Murder by her husband by strangulation

पिंपरी: पिंपरीमधील वाकडमधील भुजबळ वस्ती येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मयत महिलेच्या मामीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

किर्ती अशिष भोसले (वय १९) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी आशिष भोसले (वय २३, रा. सासवड, सध्या येळवंडे एम्पायर, भुजबळ वस्ती, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष हा आपली पत्नी किर्ती सोबत वाकड परिसरातील भुजबळ वस्तीमधील वेळवंडे एम्पायर येथे राहत होता. त्याचे ऑफीसमध्ये असलेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामध्ये किर्ती अडथळा ठरत असल्याने बुधवारी आशिष याने किर्तीला शारिरीक मानसिक त्रास देत मारहाण करून ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर तो घराला कुलुप लावून पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Web Title: wife who was an obstacle in love was Murder by her husband by strangulation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here