शिर्डी साईबाबांच्या चरणी ४० लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण
Shirdi Saibaba: ४० लाख रुपये किमतीचा ७४२ ग्राम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण.
शिर्डी: शिर्डी साईबाबांवर देश विदेशातील भाविकांची अफाट श्रद्धा आहे. हेच भाविक साईबाबांच्या चरणी भरभरून दान करीत असतात. असेच हैद्राबाद येथील डॉ. रामकृष्णा मांबा यांनी सुमारे ४० लाख रुपये किमतीचा ७४२ ग्राम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. दिवसेंदिवस साई बाबांच्या झोळीत भरभरून दान प्राप्त होत असून साई बाबांच्या खजिन्यात वाढ होत आहे.
शुक्रवार दि.२२ जुलै रोजी मध्यान्ह आरतीला हैदराबाद येथील डॉ रामकृष्ण मांबा आणी श्रीमती रत्ना मांबा यांच्या परिवाराने हजेरी लावून श्री साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी १९९२ साली साईबाबांना केलेल्या नवसाची फेड म्हणून पाऊण किलो वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला.
याप्रसंगी निमगांव येथील साईनिवाराचे योगेश तिय्या, स्वप्निल शिंदे आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ रामकृष्ण मांबा म्हणाले की, माझी श्री साईबाबांवर अतुट श्रद्धा असून बाबांकडे जे काही मागीतले त्या सर्व ईच्छा मनोकामना पुर्ण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Offering a gold crown worth 40 lakh rupees at the feet of Shirdi SaiBaba