अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
Ahmednagar News: अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ, अद्याप ओळख पटलेली नाही.
अहमदनगर: नगर तालुक्यातील विळद शिवारातील नर्सरीजवळ एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पुरुषाची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुरूवारी सायंकाळी नगर-मनमाड महार्गावरील विळद शिवारात जगताप नर्सरीजवळ एका 45 वर्षीय पुरूष बेशुध्द अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. हा पुरूष सुजलेल्या स्थितीत होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सदर पुरूषाला मल्हारी गायके यांनी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान सदर पुरूषाला डॉक्टरांनी मयत घोषित केले. शुक्रवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
दरम्यान सदर पुरूष कोण? त्याचा मृत्यू कोणत्या कारणातून झाला? याचा उलगडा होऊ शकला नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
Web Title: Dead body of a stranger was found