Home संगमनेर संगमनेर मलनिस्सारण प्रकल्प मोर्चा: कॉंग्रेसला मतदान करू नका

संगमनेर मलनिस्सारण प्रकल्प मोर्चा: कॉंग्रेसला मतदान करू नका

Sangamner Morcha: लोकवस्तीत मलनिस्सारण प्रकल्प, आरोग्याला धोका, भाजप, शिवसेनेचा जागेला विरोध, कॉंग्रेसवर टीका.

Sangamner Sewage Project Morcha Don't Vote Congress

संगमनेर: संगमनेर नगर परिषदेच्या वतीने लोकवस्तीत मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. परंतु हा प्रकल्प लोकवस्तीत उभारला जात असल्याने आमचा विरोध आहे. या प्रकल्पाची जागा बदलण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २२) संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरातील जोर्वे नाका परिसरात नियोजित मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिला टप्पा ६५ कोटी आणि दुसरा टप्पा ३४ कोटी सांगितले. असे एकूण ९९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. लोकवस्तीत हा प्रकल्प बांधू नये, याकरिता गत 33 दिवसांपासून मलनिस्सारण प्रकल्प स्थलांतर कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याने मोर्चा काढण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.

मोर्चात मुस्लीम समाजाचे धर्मगुरू सहभागी झाले होते. मौलाना रकीब सय्यद, मौलाना मुफ्ती तालीम, इसाकखान पठाण, जावेद सहभागी होते.  मलनिस्सारण प्रकल्प लोकवस्तीत उभारण्यात येत आहे. त्यामुळे आमचाही या प्रकल्पाच्या जागेला विरोध असल्याचे शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे, ज्येष्ठ नेते आप्पा केसेकर, शहरप्रमुख अमर कतारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी आपल्या भाषणात सांगितले. मलनिस्सारण प्रकल्प लोकवस्तीत काहींनी काँग्रेसवर टीका देखील केली

प्रकल्प करताना प्रशासनाने आम्हा कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही. हा प्रकल्प होत असलेल्या परिसरातील रहिवासी यांच्या बरोबरच साधारण दीड किलोमीटर परिसरातील) रहिवासी यांच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे हा प्रकल्प दुसरीकडे! स्थलांतरित करा, अशी मागणी शौकत जहागीरदार यांनी केली.

गेल्या वेळी संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष पदाकरिता मुस्लीम उमेदवार उभा असूनही आम्ही नगराध्यक्षा म्हणून दुर्गाताई तांबे यांना भरघोस मतदान केले. त्यामुळे मलनिस्सारण प्रकल्पाची जागा बदला. याबाबत त्यांनी सकारात्मक विचार करावा. – शफीक बेपारी, संगमनेर

संगमनेर नगर परिषदेत गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यात मुस्लीम समाज नेहमीच काँग्रेसच्या सोबत उभा राहिला. मात्र, आमचा मुस्लीम समाज अडाणी आहे. अशी टीका आमच्यावर होते. असे असताना आता काँग्रेसला मतदान करू नका. मलनिस्सारण प्रकल्पाची जागा येथील सत्ताधाऱ्यांनी निश्चित केली. आहे. येथील रहिवासी नागरिकांच्या आरोग्याचा कुठलाही विचार केला गेला नाही. खेळाचे मैदानावर हा प्रकल्प उभारला जात आहे.

Web Title: Sangamner Sewage Project Morcha Don’t Vote Congress

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here