Home संगमनेर संगमनेर: प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू

संगमनेर: प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू

college student drowned while going for a swim in Pravara river Sangamner 

Ahmednagar News | संगमनेर | Sangamner: काल सायंकाळी मित्रांसमवेत पोहोण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाचा प्रवरा नदीपात्रात गंगामाई घाटाच्या परिसरात खड्ड्यात बुडून (drowned )मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नदीपात्रात अडकलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

संकेत वाडेकर, रा. मांडवे ता. संगमनेर असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत आपल्या मित्रांसह काल सायंकाळी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. गंगामाई घाटाच्या परिसरात हे विद्यार्थी पोहण्याचा आनंद घेत होते. प्रवरा पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. संकेत याला नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तो एका खड्ड्यात अडकला, त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचे अन्य तीन मित्रही नदीपात्रात आंघोळ करत होते. त्यांनाही नदीपात्राचा अंदाज आला नाही. मात्र त्यांनी आरडाओरड केल्याने इतर नागरिकांनी त्यांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.  

या घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व पोलीस खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मयत संकेत याचा मृतदेह संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेला. यावेळी  नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

Web Title: college student drowned while going for a swim in Pravara river Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here