Home अहमदनगर जवखेडे तिहेरी हत्याकांडप्रकरणी तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता- Murder Case

जवखेडे तिहेरी हत्याकांडप्रकरणी तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता- Murder Case

Ahmednagar Javakhede Murder Case News

Ahmednagar Murder Case | अहमदनगर: जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव यांची प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधारकर यार्लगड्डा यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्ष गुन्हा सिद्ध न करू शकल्याचां दावा आरोपीचे वकील सुनील मगरे यांनी केला आहे.

२१ ऑक्टोबर २०१४ रोजी जवखेडे खालसा ता. पाथर्डी (Pathardi)येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच कुटुंबातील तीन तीन जणांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी ,मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकाच दलित कुटुंबातील तिच्यांची हत्या झाल्याने राज्य हादरले होते. याप्रकरणात गृहमंत्रालयाने विशेष लक्ष घातले. विशेष पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. तब्बल दीड महिना या पथकाने तळ ठोकून कसून तपास केला. संशियीत व काही स्थानिक नागरिकांचे नार्को व इतर चाचण्या केल्यानंतर मयत जाधव कुटुंबियांच्या घरातीलच प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना अटक करण्यात आली होती.

Web Title: Ahmednagar Javakhede Murder Case News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here