Home महाराष्ट्र आनंदाची बातमी: LPG Gas Price सिलेंडरच्या दरात मोठी कपात

आनंदाची बातमी: LPG Gas Price सिलेंडरच्या दरात मोठी कपात

LPG Gas Price Today

LPG Gas Price:  गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते. त्यात (LPG GAS)गॅस सिलेंडरचेही भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मोठी झळ बसत होती. आज झालेल्या दर कपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. 

इंधनदरवाढीमुळे महागाईचे चटके सोसावे लागत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करून केंद्र सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

आता गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.

इंडियन ऑइलने १ जून रोजी जाहीर केलेल्या किमतीनुसार, १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. १ जून रोजी दरात कपात केल्यानंतर आता दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर २३५४ ऐवजी २२१९ रुपयांना मिळेल. तसेच कोलकाता येथे २४५४ ऐवजी २३२२ रुपये, मुंबईत २३०६ ऐवजी २१७१.५० रुपये आणि चेन्नईत २३७३ ऐवजी २५०७ रुपयांना मिळेल. कंपन्यांनी केलेल्या दरकपातीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल, असे म्हटले जात आहे. यापूर्वी १ मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Web Title: LPG Gas Price Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here