Home Accident News अहमदनगर: कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात एक ठार

अहमदनगर: कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात एक ठार

Ahmednagar Kopragaon Accident:  कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक झाली असून चालक ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

container and a truck collided head-on, one person was killed in the accident

अहमदनगर | कोपरगाव:  कोपरगाव शहरालगत असलेल्या येसगाव खिर्डीगणेश शिवारालगत भास्कर वस्ती जवळ रविवारी दुपारी कोपरगावहुन येवल्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्रमांक एच.पी. 72 डी 3136) व येवल्याहून कोपरगावकडे येणारा आयशर ट्रक (एम.पी. 09 जी ई 6274) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात (Accident) एम.पी 09 जी ई 6274 या वाहनातील चालक ठार झाला असून कंटेनर एच. पी. 72 डी 3136 मधील अशोकसिंग राजपूत व भागसिंग सोहता हे दोघेही जखमी झाले आहे.

जखमीना उपचारकरिता रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयताचा मृतदेह शवविच्छेदाना करिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. सदर अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मदत करून जखमिंना उपचारकरिता रुग्णालय हलविले. यावेळी वाहतूक जाम झाल्याने तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरळीत केली. अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: container and a truck collided head-on, one person was killed in the accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here