Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: तरुणीला काटवनात नेऊन आळीपाळीने अत्याचार

अहमदनगर ब्रेकिंग: तरुणीला काटवनात नेऊन आळीपाळीने अत्याचार

Ahmednagar Young Women Molested:  तरुणीला काटवनात नेले अन आरोपी महिलेने पीडितेचे हात धरले व इतर आरोपींनी आळीपाळीने अत्याचार (abused).

young girl molested crime news Ahmednagar

अहमदनगर: अहमदनगर मधून अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला वाहनातून घेऊन जात अत्याचार केल्याची घटना शनिवारी भिंगारमधील काटवनात घडली. यासंदर्भात नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित तरुणीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

इम्रान शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मुकुंदनगर), शहानु शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बाराइमाम, कोठला), रिक्षा चालक अकरम ऊर्फ अरशद (रा. झेंडीगेट), बाशीद मुक्तार खान (रा. लिंक रोड, केडगाव) व केडगाव उपनगरात राहणारी एक महिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

वरील पाच आरोपींनी पीडित फिर्यादी तरुणीला बळजबरीने रिक्षातून गोंविदपुराच्या पुढे काटवनात नेले. पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महिलेने पीडितेचे हात धरले व इतर आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: young girl molested crime news Ahmednagar

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here