Home संगमनेर अरुण इथापे यांचा प्रतीकात्मक पुतळा अन् फलकाला मारले जोडे

अरुण इथापे यांचा प्रतीकात्मक पुतळा अन् फलकाला मारले जोडे

Sangamner: अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molested); गुन्हा दाखल होऊनही अटक नाही.

Molested Case Arun Ethape's symbolic statue and plaque were added

संगमनेर:  १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलत विचित्र हावभाव करणाऱ्या डॉ. इथापे याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, परंतु त्याला अद्यापही अटक झालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व इतरही आदिवासी संघटनांच्या वतीने रविवारी (दि. २५) प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या मुलींनी डॉ. अरुण इथापे याच्या याच्या प्रतीकात्मक प्रतीकात्मक पुतळा अन् फलकाला जोडे मारले.

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मोर्चाला सुरुवात झाली. प्रांत कार्यालयावर मोर्चा नेत असताना सहभागी झालेल्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत त्याला अटक करावी अशी मागणी केली. बस स्थानकासमोर डॉ.इथापे यांच्या प्रतीकात्मक पुतळा अन फलकाला मोर्चात सहभागी झालेल्या मुलीनी जोडे मारले. प्रांत कार्यालयातील नायब प्रांत तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव, राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समितीचे सदस्यबाळकृष्ण गांडाळ, डॉ. जालिंदर घिगे, संदीप गवारी, रामा पथवे, सोनू मेंगाळ, विलास आगिवले, पंढरीनाथ काळे, ज्ञानदेव मधे, सुशीलकुमार चिखले, प्रदीप गोडे, पांडुरंग पथवे, निवृत्ती गिन्हे, राहुल तळपे, मोहन खाडे, दीपक डगळे, संदीप पवार, मोहन खाडे, पोपट मेंगाळ यांसह तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: Molested Case Arun Ethape’s symbolic statue and plaque were added

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here