Home अहमदनगर अहमदनगर: जेवणाच्या बिलावरून हॉटेलचालकास मारहाण

अहमदनगर: जेवणाच्या बिलावरून हॉटेलचालकास मारहाण

Ahmednagar | Karjat: कर्जत शहरातील घटना : दिवसभर कडकडीत बंद; सहा जणांना अटक (Arrested).

Beating the hotelier over the meal bill six arrested

कर्जत : काही जणांनी कर्जत शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण केले. बिलाचे पैसे मागताच ते देण्यास नकार देत हॉटेलमधील साहित्याची मोडतोड केली. उलट हॉटेलचालकास मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी (दि. २४) सायंकाळी घडला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून कर्जत शहरात रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

सदर घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा समाज कर्जतच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती. व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांनीही दिवसभर कडकडीत बंद पाळला.

हा प्रकार कर्जत शहरातील कुळधरण रस्त्यावरील गुंडवस्ती येथील हॉटेल तान्हाजी येथे घडला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरात शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये जेवायला आलेले ग्राहक आणि हॉटेल चालकामध्ये बिलावरून वाद झाले. यावेळी संबधित टोळक्याने हॉटेलचे मालक पंडित निंबाळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली त्यांनी हॉटेलचालक हॉटेलमधील फ्रीज, काउंटर, किचनचे तपास सहायक पोलिस निरीक्षक कर्जत) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात इतर आरोपींना फोन करून बोलावून निंबाळकर यांना काठीने व गजाने साहित्य, टीव्ही, टेबल, खुर्च्या, बेसिन, सतीश गावित करत आहेत. ही कारवाई मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

सोहन किसन कदम, करण बाळासाहेब थोरात, सागर उर्फ आनंद गौतम समुद्र, रोहन किसन कदम, मनोज विजय माने सर्व (रा. कर्जत) या सहा आरोपींना पकडले. इतर आरोपींची नावे निष्पन्न करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी शनिवारी रात्री हॉटेलमध्ये तोडफोड करून अतोनात नुकसान केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी कर्जत शहर बंद ठेवण्यात आले होते. सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. भविष्यात असे प्रकार कर्जतकर सहन करणार नाहीत.

– वैभव लाळगे, प्रमुख समन्वयक, सकल मराठा समाज, कर्जत

Web Title: Beating the hotelier over the meal bill six arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here