Home पुणे धक्कादायक घटना: एकाच घरात तरुण आणि तरुणीची एकाच वेळी आत्महत्या

धक्कादायक घटना: एकाच घरात तरुण आणि तरुणीची एकाच वेळी आत्महत्या

Suicide Case:  धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज भागातील, एका घरात तरुण आणि तरुणीची एकाच वेळी आत्महत्या, दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.

Suicide of a young man and a young woman in the same house

पुणे | Pune: कात्रज येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका घरात तरुण आणि तरुणीची एकाच वेळी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर परिसरात घडली आहे. राजू शेख (वय 31) आणि बरखा मंडल (वय 33) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  बरखा आणि राजू मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघेजण कात्रज भागात राहायला आले होते. संतोषनगरमध्ये त्यांनी भाडेतत्वावर खोली घेतली होती. २५ डिसेंबरला बरखा आणि राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. राजूने हॉलमध्ये फॅनला लटकून गळफास घेतला तर बरखाने बेडरूममधील फॅनला लटकून आत्महत्या केली आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

आसपासच्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. घरात कुठली ही सुसाईड नोट सापडली नाही. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या घटनेप्रकरणी रात्री उशीरा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Suicide of a young man and a young woman in the same house

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here