Home Accident News भीषण अपघात; कंटेनर पलटी झाल्याने कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू

भीषण अपघात; कंटेनर पलटी झाल्याने कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू

Accident News: अपघातात एका कारचालकासह महिलेचा जागीच मृत्यू झाला.

container overturned and the car was crushed, two died on the spot

मुंबई: पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारा कंटेनर विरुद्ध बाजुच्या लेनवर पलटी झाल्याने पाच वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.  या अपघातात एका कारचालकासह महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कंटेनर (एमएच-४६, एआर ०१८१) पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होता. यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरुद्ध लेनवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरून येणाऱ्या इतर पाच वाहनं बाधित झाली. यामध्ये एका सुझुकी डिझायर कारचा (एमएच-४८, ए ६५१२) चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात कार चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोन महिला जखमी झाल्या. दोन्ही जखमी महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. वाहनांना बाजूला करण्यात आले आहे.

Web Title: container overturned and the car was crushed, two died on the spot

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here