Home महाराष्ट्र कोरोनाचे जंतू सापडले असते तर फडवणीसांच्या तोंडात कोंबले असते

कोरोनाचे जंतू सापडले असते तर फडवणीसांच्या तोंडात कोंबले असते

Controversial statement Shiv Sena MLA Sanjay Gaikwad

मुंबई: मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडवणीसांच्या तोंडात कोंबले असते इतका तिरस्कार या लोकांबाबत झाला आहे असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

राजकारण न करता  राज्याला मदत केली पाहिजे अगोदर महाराष्ट्र जगला पाहिजे नंतर राजकारण आहे. माणसेच मेली तर कोण मतदान करणार तुम्हाला असे संजय गायकवाड यांनी म्हंटले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या १०५ आमदारांना मतदान केले आहे व २० खासदारही निवडून दिले आहेत हे भाजपाने विसरू नये. अशा परिस्थितीत केंद्राकडून राज्यातील लसनिर्मिती कंपन्यांना सांगितले जाते की, तुम्ही महाराष्ट्राला लस व रेमडेसिवीर देऊ नका, ऑक्सिजनची मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही अशी टीका गायकवाड यांनी केली आहे. भाजपचे अशा प्रकारचे नीच राजकारण सर्व महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत पण महाराष्ट्राला नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रापेक्षा महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची आहे असे गायकवाड म्हणाले. मोदी सरकार व फडवणीस यांना लाज वाटली पाहिजे फडवणीस मुख्यमंत्री असते तर मोदींनी असे केलं असतं. राज्यामधील मंत्री जीव तोडून नियोजन करत आहे मदत करायची सोडून खिल्ली उडवतात. हे सरकार अपयशी होईल हे पाहतात. पण यामध्ये लाखो लोकांचे जीव जातील त्याच काय असा सवालही गायकवाड यांनी केला आहे.  

Web Title: Controversial statement Shiv Sena MLA Sanjay Gaikwad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here