Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात मृत्यू तांडव सुरूच, गेल्या २४ तासांत १०२ मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात मृत्यू तांडव सुरूच, गेल्या २४ तासांत १०२ मृत्यू

Ahmednagar Corona Death update Today 102

अहमदनगर: अहमदनगर शहरासह इतर तालुक्यांत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. गेल्या २४ तासांत ३५९२ रुग्णसंख्या वाढली आहे तर मृत्यू तांडव सुरूच आहे. आज अवघ्या २४ तासांत १०२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात रुग्ण अतिशय प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने रुग्णालये फुल झाले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या त्रुटीमुळे रुग्णांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नागरिक वेळेवर उपचार घेत नसल्याने त्यांच्याच जीवावर बेतत असून तब्येत खालाविल्यावर व ऑक्सिजन कमी झाल्यावर थेट हॉस्पिटल गाठतात यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे व दगाविण्याचे प्रमाण जास्त असल्याचा दावा केला जात आहे.

मृत्यू तांडव सुरु असल्यामुळे अमरधाममधील अंत्यविधी करणारी यंत्रणाही कोलमोडलेली आहे. जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. गेल्या २४ तासांत १०२ कोरोना बाधितांची मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.   

अहमदनगर जिल्ह्यातील बरे झालेली रुग्णसंख्या: १,१४,६४२

सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या: १९९०५

मृत्यु: १५८२

एकूण रुग्णसंख्या: १,३६,१२९

Web Title: Ahmednagar Corona Death update Today 102

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here