Home क्राईम लग्नाचे आमिष देत पोलीस अधिकाऱ्यानेच केले महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार

लग्नाचे आमिष देत पोलीस अधिकाऱ्यानेच केले महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार

police officer rape a female police officer 

मुंबई: एका महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी पडीत महिला पोलिसाच्या तक्रारीवरून बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षकाने पिडीत महिला पोलीस अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. पिडीत महिला पोलिसाने लग्नास विचारले असता आरोपीने नकार दिल्याचे म्हंटले आहे. नकार दिल्याने महिला पोलिसाने पोलीस अधिकाऱ्याविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आरोपी पोलीस अधिकारी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पिडीत महिला पोलिसाच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक  आणि त्याच्या कुटुंबातील दोघांच्या विरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: police officer rape a female police officer 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here