करोना डेल्टा प्लसने लोकांची चिंता वाढली
अहमदनगर | Delta Plus Variant: गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनच्या निर्बंधातून शिथिलता दिल्याने बाजारात रेलचेल वाढली होती. विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा रुळावर येत असतानाचा आता कोरोनाच्या नव्या वेरीयंटने महाराष्ट्रात डोके वर काढले आहे. कोरोना डेल्टा प्लसमुळे पुन्हा एकदा तिसरी लाट व संभाव्य लॉकडाऊनचे संकेत मिळत असून लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.
मागील महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने बस सेवा व इतर उद्योग खुलले आहेत. बेरोजगारांना हाताला काम मिळू लागल्याने आर्थिक स्थिती सुधारत होती. यामुळे नैराशेच्या गर्तेत अडकलेले अनेक लघु उद्योजक व छोटे व्यावसायिकांना हवेसे वाटू लागले होते. ज्यांची दुकाने भाड्याने आहेत अशा दुकानदारांना दुकान भाडे व घर खर्च देताना जीवावर येत होत. परंतु गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल वाढल्याचे दिसून आले.
Web Title: Corona Delta Plus Variant raised public concern