Home अकोले अकोले तालुक्यात एकाच दिवसात ७ व्यक्ती कोरोना बाधित

अकोले तालुक्यात एकाच दिवसात ७ व्यक्ती कोरोना बाधित

Corona News Akole taluka seven infected

अकोले | COrona News: तालुक्यात मंगळवारी दिवसभरात सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ७३४ इतकी झाली आहे.

अकोले तालुक्यासाठी मंगळवार हा दिलासादायक ठरला आहे. गेल्या मागील काही दिवसांच्या तुलनेत करोनाबाधित संख्या कमी झाली आहे. तसेच तालुक्यातील १५ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.

आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये समशेरपुर येथील ४० वर्षीय पुरूष, वाघापुर येथील ७२ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ३० वर्षीय पुरूष, अशी तिन व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात गर्दणी येथील ३२ वर्षीय पुरूष, चितळवेढे येथील ७० वर्षीय महीला, कळस बु येथील ३४ वर्षीय महीला, ३१ वर्षीय पुरूष, अशी ०४ व्यक्ती पॅाझिटीव्ह आली असुन आज दिवसभरात ०७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ७३४ झाली आहे.तालुक्यात आत्तापर्यंत ११ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona News Akole taluka seven infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here