Home महाराष्ट्र धोका वाढला: राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन

धोका वाढला: राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन

Corona News Omicron to 7 more in the state

पुणे | Corona News : राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार वाढला आहे. पुणे आणि पिंपरी चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं आहे.

सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 8 वर पोहोचली आहे.

Web Title: Corona News Omicron to 7 more in the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here