Home अहमदनगर मोबाईलवर कोणाबरोबर बोलतेस म्हणाल्याच्या रागातून पत्नीने पतीस मारहाण

मोबाईलवर कोणाबरोबर बोलतेस म्हणाल्याच्या रागातून पत्नीने पतीस मारहाण

Crime News Rahuri Wife beats husband out of anger 

राहुरी |Crime News|Rahuri: पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या घटना आपण पहिल्या असतील. मात्र, पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत पतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

नंदू लक्ष्मण आघाव (वय 47 वर्षे, राहणार रेल्वे स्टेशन, राहुरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, दि. 2 डिसेंबर रोजी सव्वासात वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी आरोपी निता नंदू आघाव ही मोबाईलवर कोणाबरोबर बोलत होती. नंदू आघाव यांनी तिला विचारले, कोणाबरोबर बोलत आहेस? तेव्हा ती म्हणाली, मी फोनवर बोलत नव्हते. या गोष्टीचा तिला राग अनावर झाल्याने तिने घरातील लाकडी बॅटने नंदू आघाव यांच्या डोक्याला मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

नंदू लक्ष्मण आघाव यांनी तातडीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. नंदू आघाव यांच्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी निता नंदू आघाव हिच्या विरोधात मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime News Rahuri Wife beats husband out of anger

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here