Home महाराष्ट्र महाराष्ट्र पुन्हा हादरला: सैराट पुनरावृत्ती प्रेमविवाह आणि मुंडक छाटून हत्या

महाराष्ट्र पुन्हा हादरला: सैराट पुनरावृत्ती प्रेमविवाह आणि मुंडक छाटून हत्या

Sister murder by brother at Aurangabad 

औरंगाबादः महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमविवाह केल्याने सख्या भावानं बहिणीची हत्या (Murder) केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार , वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून कोयत्याने वार करत बहिणीची मुंडक छाटून हत्या केल्याचा अमानुष प्रकार घडला आहे.

बहीण आणि तिचा प्रियकर विवाह करून आले होते. बहिणीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपीनं मनात ठेवला होता. त्याच रागाच्या भरातून भावाने बहिणीची हत्या केली. धारदार कोयत्याने मुंडक धडावेगळ करत तरुणीची हत्या केली आहे

या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हत्या करणारा भाऊ अल्पवयीन असल्याचे समजते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sister murder by brother at Aurangabad 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here