Home अहमदनगर पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीची आत्महत्या

Husband commits suicide due to wife's immoral relationship

कर्जत | Suicide: पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील एका युवकाने आपल्या पत्नीच्या अनैतिक संभांधाला कंटाळून अखेर आत्महत्या केली. घराच्या शेताजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्याच्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, आपल्या बंधूची पत्नीचे एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळे ते श्रोगोंदा तालुक्यामध्ये खोली भाड्याने घेऊन दोन महिन्यांपासून राहत होते. हे कळल्यानंतर त्याने तिच्या नातेवाईक यांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकानी तिला समजूत दिली. यापुढे असे वागू नये असा सल्ला दिला होता. मात्र पत्नीने इतर काही जणांच्या मदतीने पतीला मारहाण करून सोडचिट्ठीसाठी १० लाख रुपयांची मागणी केली. यासर्व प्रकारावरून कर्जत पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Husband commits suicide due to wife’s immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here